जळगावसह, धुळे जिल्ह्यातून दुचाकी चोरणारा अल्पवयीन गुन्हेगारास अटक

जळगाव प्रतिनिधी । स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चोपडा येथून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. त्याने जळगासह, धुळे जिल्‍ह्‍यातून दुचाकी वाहने लंपास केली असून अनेक घरफोड्याची कबुली दिली आहे.  चौकशी अंती त्याला परत बालसुधारगृह मध्ये दाखल करण्यात आले आहे.

मध्यप्रदेशातील झाबुवा जिल्ह्यातील बाल सुधारगृहातून चोरीच्या गुन्ह्यातील विधीसघषींत बालकाने पळ काढला होता. या प्रकरणी मध्यप्रदेश पोलिसदलाचे दोन पोलिसांचे निलंबनही झाले होते. चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला हा संशयीत दुचाकी चोरीत पारंगत असून मध्यप्रेदशातुन पळ काढत त्याने चोपडा तालूक्यात बस्तान मांडले होते. गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार त्यांनी पोलिस नाईक अश्रफ शेख, इद्रीस पठाण, दत्तात्रय बडगुजर, किरण चौधरी, दिपक शिंदे, भारत पाटिल अशांचे पथक तपासावर रवाना केले होते. पथकाने संशयीताला चोपडा तालूक्यातून चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यावर त्याने एका मागून एक चार वाहने काढून दिली. त्यात धरणगाव, एरंडोल, शिरपुर, धुळे आदी ठिकाणी वाहने चोरुन आणल्याचे त्याने कबुल केले असून काही घरफोडीचे गुन्हेही कबुल केले. चौकशी अंती त्याला जळगावच्या बालसुधारगृहात दाखल करण्यात आले असून मध्यप्रदेश पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. 

Protected Content