जामनेर तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जामनेर तालुक्यात अनेक गावांमध्ये अवकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या वादळ व गारपीटमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर काही ग्रामस्थांचे घराची पडझड झाल्याने संसार उघड्यावर आला आहे.

 

अवकाळी पावसामुळे केळी, मका, ज्वारी, फळबाग याचे मोठे नुकसान झाले आहे अनेक गावांमध्ये घरांच्या पडझडी झाले असून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे कर्नाटक दौऱ्यावर असल्यामुळे त्यांच्या पत्नी व जामनेरच्या नगराध्यक्ष साधना महाजन यांनी तालुक्यातील पाळधी, फत्तेपुर, कासली, मादणी, टाकळी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी अनेक घराचे नुकसान झाले नुकसानग्रस्त कुटुंबांना पाहिजे ती मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर शेतकऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला व शेतीच्या पिकाचे पंचनामे करून शासनस्तरावर नुकसान भरपाई देण्यात येईल व धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, दीपक तायडे, कमलाकर पाटील, तहसीलदार अरुण शेवाळे, गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, विस्तार अधिकारी अशोक पालवे, कृषी अधिकारी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content