एक जुन नंतरच कापसाची लागवड करा : कृषी अधिकारी ए.व्ही.जाधव

पाचोरा, प्रतिनीधी ।  पाचोरा तालुका व पंचक्रोशितील शेतकरी बांधवांनी कापुस पिकाची लागवड १ जुन नंतरच करावी असे आवाहन पाचोरा तालुका कृषी अधिकारी ए. व्ही. जाधव यांनी एका प्रसिध्दी पञकान्वये केले आहे.

तालुका कृषी अधिकारी यांनी दिलेल्या प्रसिध्दीपञकात नमुद केले आहे की, सध्या कोरोना विषाणु संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरू असलेल्या लाॅकडाऊन नंतरच शेतकर्‍यांना कपाशीचे बियाणे मिळणार आहे. मे महिन्याच्या मध्यावर्तीत ४५ अंश सेल्शियस इतके तापमान असते. जास्त तापमानामुळे कपाशी पिकाची लागवड व उगवणीची टक्केवारी कमी होते. उगवले तरी नविन अंकुर काढुन प्रती हेक्टरी झाडांची संख्या कमी होते. झाडांच्या मुळांची वाढ समाधानकारक होत नाही. पिकावर जास्त तापमानाचा  विपरित परिणाम होतो. तसेच या लागवडिवर सेंद्रिय बोंड अळीचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणुन मागील दोन वर्षापासुन आपण बागायत कापुस पिकाची लागवड १ जुन नंतरच करावे असे आवाहन पाचोरा तालुका कृषी अधिकारी ए. व्ही. जाधव यांनी केले आहे.

 

Protected Content