तालुक्यातील वलठान येथे १०० जणांनी घेतली लस

चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तालुक्यातील वलठान येथे सरपंच व वैद्यकीय अधिकारी यांच्या अथक परिश्रमातून कोव्हिशिल्ड लसीकरणाचे कॅम्प भरवण्यात आले. यावेळी एकूण १०० जणांना लसीकरण करण्यात आले असून ग्रामस्थांकडून प्रचंड प्रतिसाद दिसून आला.

 

चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी कलम-१४४ प्रमाणे संचारबंदी पुकारण्यात आलेली आहे. दरम्यान मृत्यू दरात घट करण्यासाठी सरकारने कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सीन ह्या लसीकरणाला सुरूवात केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील वलठान येथे लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आले असून सोमवार, २४ रोजी लसीकरणाचे कॅम्प भरवण्यात आले. वलठान गावाचे सरपंच कविता संजीव राठोड व वैदकिय अधिकारी नितीन साळूंके यांच्या विशेष प्रयत्नातून हि मोहीम राबविण्यात आली. यावेळी एकूण १०० जणांचे कोव्हिशिल्ड लसीकरण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ता संजीव राठोड व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने हि मोहीम राबविण्यात आली. लसीकरण यशस्वी पार पाडण्यासाठी ग्रामसेवक मराठे भाऊसाहेब, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, रोजगार सेवक, संगणक ऑपरेटर, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मदतनीस, पाणी पुरवठा शिपाई, पोलिस पाटील व गावातील तंत्रस्नेही तरूण यांनी प्रयत्न केले.

Protected Content