कोरोनाला हरवण्यासाठी केवळ लॉकडाउन पुरेसे नाही : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लॉकडाउन हा केवळ हा पॉझ बटनाप्रमाणे आहे. लॉकडाउन उघडताच कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ शकते. व्हायरस आपले काम पुन्हा सुरू करेल. त्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी केवळ लॉकडाउन पुरेसे नाही, असे मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडियाद्वारे आज माध्यमांशी संवाद साधला.

 

राहुल गांधी पुढे म्हणाले की, देशात रँडम चाचण्या मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे, हेच कोरोनाशी लढण्याचे खरे शस्त्र आहे. भारतात कोरोनाच्या परिस्थितीने गंभीर पल्ला गाठला आहे. अशात सर्वांनी एकजूट होऊन कोरोनाच्या विरोधात लढा द्यायला हवा. या कठिण परिस्थितीत सरकार आणि प्रशासनासह सर्वांनी एका स्ट्रटेजीप्रमाणे काम करायला हवे. लॉकडाउनमुळे अद्याप समस्या सुटलेली नाही. यामुळे समस्या केवळ पुढे ढकलली गेली आहे. तसेच कोरोनाशी लढण्यासाठी ज्या गतीने राज्यांना पैसे पोहोचले पाहिजेत, तसे पोहोचत नाहीत. देशात सध्या बेरोजगारीही वाढू लागली आहे. येत्या काळात देशात खाद्यान्नाचीही कमतरता भासेल,अशी भीती देखील राहुल यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content