ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी बहुजन समाजाची बैठक

 

पारोळा, प्रतिनिधी । ओबीसींचे आरक्षण वाचविण्या संदर्भात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित सर्व ओबीसी समाज प्रतिनिधींची बैठक सोनार समाजाचे अध्यक्ष प्रभाकर भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

ओबीसी आरक्षण वाचविण्यासंदर्भात ओबीसी बहुजन समाजातील पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी चर्चा विनिमय व संघर्ष करण्याबाबत दिशा ठरविण्यात आली. याप्रसंगी सर्व बारा बलुतेदार, एससी, एसटी, एनटी, व सर्व ओबीसी समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांनी एक मताने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता इतर समाजाला आरक्षण द्यावे अशी एकमताने यावेळी मागणी केली. त्यासाठी वेळोवेळी मोर्चे आंदोलन व निवेदन देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
बैठकीला माळी समाजाचे अध्यक्ष रमेश महाजन, कासार समाजाचे अध्यक्ष संजय कासार, बडगुजर समाजाचे पदाधिकारी प्रवीण बडगुजर, भावसार समाजाचे अध्यक्ष ओंकार गणेश भावसार, नाभिक समाजाचे अध्यक्ष गजानन ठाकरे, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बापू महाजन, तालुका अध्यक्ष संतोष महाजन,विकास महाजन, छोटू जडे, शांताराम महाजन, गोकुळ मिस्‍तरी, नामदेव माळी, उखा महाजन, रवींद्र कासार, धिरज महाजन, निंबा माळी भगवान महाजन, भिकन महाजन, समता परिषद शहराध्यक्ष धनराज महाजन, कार्याध्यक्ष आबा महाजन, माळी महासंघाचे छोटू महाजन, शालीक महाजन, उखा महाजन, सुनील माळी, माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष वना महाजन, समता परिषदेचे तालुका उपाध्यक्ष योगेश रोकडे व असंख्य विविध ओबीसी संघटना व बहुजन समाजाचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. बैठकीमध्ये पुढील मोर्चे आंदोलन व निवेदन देण्याबाबत नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता परिषदेचे तालुकाध्यक्ष संतोष महाजन यांनी केले,तर सूत्रसंचालन माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष वना महाजन यांनी केले समता परिषदेचे उपाध्यक्ष योगेश रोकडे यांनी आभार मानले.

Protected Content