पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील एका घराला अकस्मात आग लागल्याने संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी उघडकीला आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती अशोक भोई (वय-४१) रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याच्या घराला आग लागल्याचे उघडकीला आले. यावेळी गल्लीतील नागरिकांनी आग विझविण्याचा मदत केली. दरम्यान या आगीत फ्रिज, संसारोपयोगी वस्तू आणि ३५ हजार रुपयां रोकड असा एकूण ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात ज्योती भोई यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राकेश खंडे करीत आहे.