सर्पदंशामुळे पाचोर्‍यातील महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  पाचोरा शहरातील वरखेडी रोडजवळील भैरवनाथ नगरात रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान राहत्या घरी सर्पदंश झाल्याने ६६ वर्ष वयाच्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल मनोहर नाईक हे करीत आहेत.

 

पाचोरा  येथील वरखेडी रोडवरील भैरवनाथ नगर भागातील रहिवासी तुळसाबाई विठ्ठल भोसले ह्या बुधवारी रात्री आडेआठ वाजता जेवण आटोपून भांडी घासत असतांना त्यांना विषारी सापाने चावा घेतला. यानंतर उपचारासाठी दाखल करण्याआधीच काही क्षणात त्यांचा मृत्यू झाला. मयत तुळसाबाई विठ्ठल भोसले यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केल्यानंतर ऐन आषाढीच्या दिवशी दुपारी १२:३० वाजता त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पाश्चात्य दोन मुले आहेत.

 

या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल मनोहर नाईक हे करीत आहेत.

Protected Content