ऑनलाईन जुगाराच्या जाहिरातीने विराट गोत्यात

शेअर करा !

चेन्नई वृत्तसंस्था । टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा ऑनलाईन जुगाराची जाहिरात करत असल्याने त्याला अटक करावी अशी मागणी करत एका वकिलाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना यांना अटक करण्यात यावी अशी मागणी चेन्नई येथील वकिलाने केली आहे. ऑनलाइन गॅम्बलिंगची (जुगाराची) जाहिरात हे दोन्ही मान्यवर करत असून अशा प्रकारांनी जुगाराला प्रोत्साहन दिलं जात असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. युवकांमध्ये या अ‍ॅपचे व्यसन वाढत चालले आहे. त्यामुळे या ऑनलाईन जुगार खेळण्याच्या सर्वच अ‍ॅपवर बंदी घालावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात केली आहे. सेलिब्रिटी अशा अ‍ॅप्सची जाहीरात करून तरूणांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे या दोघांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. एका कर्जबाजारी तरूणाने या ऑनलाईन अ‍ॅपसाठी पैसे उसने घेतले होते. पण तो तरूण ते पैसे परत करू न शकल्यानं त्याने आत्महत्या केली होती याकडे लक्ष वेधून ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!