Home Uncategorized खुशखबर : अखेर जळगावहून इंदूर व दिल्लीसाठी विमानसेवा सुरू होणार !

खुशखबर : अखेर जळगावहून इंदूर व दिल्लीसाठी विमानसेवा सुरू होणार !

0
1201

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या जळगावहून इंदूरमार्गे नवी दिल्ली या विमानसेवेला मुहुर्त लागला असून एक मे पासून ही सेवा सुरू होणार आहे.

जळगाव विमानतळावरून सध्या सुरू असलेल्या विमानसेवेला प्रवाशांचा अतिशय चांगला प्रतिसाद लाभत असून आता याचा विस्तार सुरू झाला आहे. जळगाव वरून इंदूर आणि दिल्ली या मार्गावर विमानसेवा सुरू करावी अशी मागणी कधीपासूनच करण्यात येत होती. कारण इंदूर आणि दिल्ली या महानगरांमध्ये जळगावहून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असल्याने ही सेवा उपयुक्त ठरेल असे मानले जात होते. या अनुषंगाने आता महाराष्ट्र दिन अर्थात १ मे पासून इंदूरमार्गे दिल्ली विमानसेवा सुरू होणार आहे.

जळगाव-इंदूर-दिल्ली ही विमानसेवा अलायन्स एयर या ख्यातनाम कंपनीच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे. यात दररोज दिल्ली विमानतळावरून सायंकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी विमान सुटून ते दोन तासात इंदूर येथे पोहचेल. येथे पंचवीस मिनिटांचा थांबा घेऊन हे विमान जळगाव येथे ७ वाजून ५५ मिनिटांनी येईल. याच विमानाचा परतीचा प्रवास रात्री ८ वाजून २० मिनिटांनी सुरू होऊन रात्री ११ वाजून २० मिनिटांनी ते दिल्ली येथे पोहचेल.

अलायन्स एयरच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या या विमानसेवेत जळगावहून इंदूरला अवघ्या चाळीस मिनिटात तर दिल्ली येथे तीन तासांत पोहचणे शक्य होणार आहे. अर्थात जळगाव शहराची मध्यप्रदेश आणि राजधानी दिल्ली येथील कनेक्टीव्हिटी अतिशय गतीमान होणार आहे. पहिल्यांदा एक महिना ही सेवा प्रायोगीक तत्वावर सुरू करण्यात येणार असून प्रतिसाद पाहून ही सेवा नियमीत करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.

जळगाव येथील विमानसेवेच्या इतिहासात आता इंदूर आणि दिल्ली येथील सेवेच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू होणार असल्याचे मानले जात आहे.


Protected Content

Play sound