पेट्रोल-डिझेलचे दर कधी तरी कमी होणारच ! : बाबा रामदेव

नागपूर प्रतिनिधी | पेट्रोल आणि डिझेलच्या दराने सर्वसामान्य त्रस्त झाले असतांना योग गुरू बाबा रामदेव यांनी ”कधी तरी पेट्रोल व डिझेलचे भाव कमी होणारच” असा आशावाद व्यक्त केला आहे.

बाबा रामदेव आज नागपूरच्या दौर्‍यावर होते. येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. त्यांनी इंधन दरवाढीवरदेखील प्रतिक्रिया दिली. पेट्रोलचे दर कमी होण्याचं स्वप्न कधी ना कधी पूर्ण होणार आहे, असे रामदेव बाबा म्हणाले. पेट्रोल डिझेल दरवाढीवर बोलताना वरील एक वाक्य म्हणत त्यांनी भविष्यात इंधनाचे भाव कमी होतील असा आशावाद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की,  बॅालिवूडमध्ये नशा करण्याचं विनाशकारी तंत्र सुरु आहे. हे भावी पिढीसाठी धोकादायक आहे. सर्व इंडस्ट्रीने मिळून आपला कचरा साफ करायला हवा. ड्रग्ज त्यांच्यासाठीच आत्मघातकी आणि धोकादायक असेल, असे रामदेवबाबा म्हणाले.

दरम्यान, सध्याच्या स्थितीत भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचाच सामना होणे भारताच्या हिताच्या विरुद्ध आहे. एकीकडे आतंकी खेळ आणि दुसरीकडे क्रीकेटचा खेळ सुरु आहे. या दोन्ही गोष्टी सोबत चालू शकत नाहीत, असे रामदेव बाबा म्हणाले. तर, ९८ टक्के आजाराचं समाधान आयुर्वेदात असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

 

Protected Content