झोमॅटो कंपनीच्या कामगारांचे विविध मागण्यांसाठी शिवतीर्थ मैदानात आंदोलन

जळगाव प्रतिनिधी । झोमॅटो कंपनीच्या कामगारांनी आज पासून कामबंद आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसाठी जी.एस.मैदानातील शिवतीर्थ येथे निषेध आंदोलन आज शनिवारी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.

कोरोना काळात झोमटो या कंपनीत डिलिव्हरी बॉय यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यांत गेल्या वर्षभरापासून पेट्रोलचे भाव वाढल्याने त्यांना दिवसाला ३०० रूपये काढणे देखील मुश्लिल होत आहे. अनेकवेळा कंपनीला परवडत नसल्याचे सांगूनही याकडे झोमॅटो कंपनी काम करणाऱ्या कामगारांच्या मागण्यांकडे दुर्ल केले जात आहे. दरम्यान, आज शनिवारी २३ ऑक्टोबर रोजी जळगाव शहरातील सर्व झोमॅटोत काम करणारे तरूण जी.एस.मैदानावर येवून विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन केले आहे. या मागण्यांमध्ये प्रत्येक ऑडर २० रूपयांऐवजी ३० रूपये देण्यात यावे, दिवसाला ६०० ते ८०० रूपये रूपयांची कमाई होईल असे नियोजन करावे, इंधन दरवाढ असल्याने पेट्रोलचा खर्च देण्यात यावा या मागण्यांसह इतर मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी अतुल खनोरे, अतुल नेवे, हर्षल पाटील, सुर्यकांत भामरे, मिलींद साई, अमोल जाधाव, गोविंदा जाधव, दिपक वाकोडे, सुनिल पाटील, प्रकाश पाटील, शेखर शर्मा, मानसी तायडे, निलेश जयस्वाल, नितीन पवार, दिनेश पवार, संतोष पाटील, शुभम पाटील, हेमंत मोरे, सुनिल पाटील, शाहरूख खान, जे.पी. महाजन यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

Protected Content