जिल्हा बँक छाननी प्रक्रिया पारदर्शकच — राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दावा (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा बँक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आपला पराभव स्पष्टपणे समोर दिसत असल्याने त्यांचा कांगावा सुरू असल्याचा पलटवार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, आ. अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, रोहिणी खडसे यांच्यासह अन्य नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे आरोप फेटाळून लावले.

 

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे सुरु असल्याचे स्पष्ट करत त्यांच्याकडून कोणत्याही उमेदवारावर अन्याय करण्याचे काम करण्यात आलेला नसल्याचे सांगितले. भाजपचे आ. राजूमामा भोळे यांनी छाननी संदर्भातील केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. कुठल्याही उमेदवाराचा अर्ज विनाकारण रद्द करण्यात आलेला नाही. आ. भोळे यांनी सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात कोणताही पुरावा नाही. सर्व प्रक्रियेवेळी उमेदवार, सूचक, अनुमोदक उपस्थित होते. याचे व्हिडिओ शुटींग करण्यात आलेली आहे. मात्र, आपल्या पाया खालची वाळू निसटत असल्यामुळेचे आ. भोळे हे बेछूट आरोप करत असल्याचे श्री. देवकर यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार सतीश पाटील यांनी निवडणुकीला उभे राहतांना उमेदवाराकडून अर्ज दाखल करतांना परिपूर्ण काळजी घेतली जात असते. मात्र, भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांच्यात निवडणुकीला उभे राहण्याची हिंमत नसल्यानेचे त्यांनी जाणीवपूर्वक अर्जावर सही केली नाही नसल्याचा आरोप केला. खासदार रक्षाताई खडसे ह्या जिल्हा परिषदेत सभापती होत्या. लोकसभेत दोनदा निवडून आल्या आहेत. त्या नाथाभाऊच्या तालमीत त्या तयार झाल्या असतांना त्यांना अर्ज भरता आला नाही हे अनाकलनीय असल्याचा टोला त्यांनीलगावला. माधुरी अत्तरदे यांना अभिसाक्षी याचा अर्थ कळला नाही व त्यांनी अधिकाऱ्यांवर आरोप केलेत असे त्यांनी स्पष्ट केले.  आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर आरोप करत ते किंग मेकर बनण्याच्या तयारीत असल्याचा टोला श्री. पाटील यांनी लगवला. जळगाव लोकसभा मतदार संघातील ७० टक्के जनतेने खासदार उन्मेष पाटील यांना पाहिलेले नसल्याचा आरोप श्री.  पाटील यांनी केला. खासदार पाटील यांनी जिल्ह्यातील दुष्काळ व ओला दुष्काळ या संदर्भात ब्र शब्द काढलेला नाही. केंद्र सरकारची भूमिकाही महाराष्ट्र सरकार विरोधातील असल्याचा आरोप केला. त्यांनी जिल्हा बँकेवर महा विकास आघाडीची सत्ता येऊन राष्ट्रवादीचा चेअरमन बनणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3910067169094083

 

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/263925605747009

Protected Content