तरूणांसाठी युवा सेनेचे मोफत प्रशिक्षण-सरदेसाई

पारोळा प्रतिनिधी | युवासेनेच्या माध्यमातून तरूणांना व त्यातही ग्रामीण तरूणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी मोफत प्रतिशक्षण देण्यात येत असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केले. ते येथील युवा संवाद कार्यक्रमात बोलत होते.

येथील हरिनाथ मंगल कार्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व युवासेना पदाधिकारी संवाद कार्यक्रम वरूण सरदेसाई यांच्या उपस्थिती झाला. याप्रसंगी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार चिमणराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, रुपेश कदम, कुणाल दराडे, शिवराज पाटील, विवेक पाटील, विवेक माळी, मिलिंद पाटील, बबलू पाटील, कमलेश पाटील, अतुल महाजन, आबा महाजन व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी वरऊ सरदेसाई म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संपर्क कमी झाला होता. तो संपर्क पुन्हा वाढवा यानिमित्ताने आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून, राज्यभर युवा मित्र पदाधिकारी संवाद दौरा आयोजित केला आहे. या दौर्‍याला पुण्यापासून सुरुवात करून मराठवाडा, नागपूर, बुलडाणामार्गे आज उत्तर महाराष्ट्रात दौरा करीत आहोत. या उपक्रमातून हजारो विद्यार्थ्यांना, तरुणांना आतापर्यंत रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. आजही युवकांना कौशल्यांच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे.
कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. त्यामुळे असंख्य तरुण तरुणी हे स्पर्धा परीक्षांकडे अधिक वळत आहेत. राज्य शासन ५०० जागांसाठी अर्ज मागविते, तर त्यासाठी पाच लाख अर्ज येतात. त्यामुळे सर्वांनाच अपेक्षित नोकरी ही मिळणे कठीण आहे. त्यामुळे निराश न होता तरुणांनी स्पर्धात्मक परीक्षा सोबतच इतर उद्योग, व्यवसाय, नोकरीचा प्लॅन बी देखील तयार ठेवावा, असा सल्ला देखील वरूण सरदेसाई यांनी दिला.

तर, राजकारणात शुद्धीकरणाची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी राजकारणात आले पाहिजे, असे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.

Protected Content