खासदार उन्मेष पाटलांनी घेतली पंतप्रधानांची भेट

चाळीसगाव प्रतिनिधी | खासदार उन्मेषदादा पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन जळगाव लोकसभा मतदारसंघातील विविध योजनांबाबतचे निवेदन सादर केले.

सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी जळगाव लोकसभा मतदार संघाविषयी माहिती घेतली. खासदार पाटील यांनी मतदार संघातील सात बलून बंधारे प्रकल्पाचा डिमांड क्रमांक ४० अंतर्गत नाविन्यपूर्ण प्रकल्पात समावेश करावा, तसेच लोकार्पणासाठी उपस्थिती देण्याची विनंती केली. पंतप्रधानांनी ही मागणी मान्य केल्यास त्यांचा खान्देशात दौरा होऊ शकतो. या भेटीदरम्यान टेक्सटाईल पार्क, जळगाव विमानतळ, गणित नगरीसाठी पंतप्रधान मोदी यांना साकडे घातले.

देशातील पशुसंवर्धन पायाभूत सुविधा निधीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करुन डेअरी फार्मिंगचा समावेश करावा. तसेच जैव इंधनावर राष्ट्रीय मंडळ स्थापन करावे. यासह टेक्सटाईल पार्क, जळगावातील विमानतळ, जळगाव शहराच्या दळणवळणासह औद्योगिक विकासासाठी मागणी करण्यात आली.

Protected Content