एरंडोलच्या उपनगराध्यक्षपदी आरती महाजन यांची निवड

एरंडोल प्रतिनिधी | येथील नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या आरती अतुल महाजन यांची विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली.

एरंडोलचे उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राजीनामा दिल्याने या पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे शहरवासियांचे लक्ष होते. या अनुषंगाने उपनगराध्यक्ष निवडीसाठी पालिका सभागृहात गुरुवारी सभा झाली. पीठासन अधिकारी तथा प्रभारी तहसीलदार एस.पी.शिरसाठ यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी किरण देशमुख, कार्यालय अधीक्षक हितेश जोगी यांनी सहकार्य केले.

याप्रसंगी आरती अतुल महाजन यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. त्यांच्या अर्जास सूचक म्हणून रमेश परदेशी इतर अनुमोदक म्हणून नितीन महाजन होते. महाजन यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्यामुळे त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

आला. नगराध्यक्ष रमेश परदेशी, मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी उपनगराध्यक्ष आरती महाजन यांचा सत्कार केला. आरती महाजन या युवा सेनेचे शहर प्रमुख अतुल महाजन यांच्या पत्नी, तर माजी नगराध्यक्ष देवीदास महाजन यांच्या स्नुषा आहेत. पारोळा बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांनीही महाजन यांचा सत्कार केला.

या निवडी प्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख वासुदेव पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख महानंदा पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, पं.स. उपसभापती अनिल महाजन आदी उपस्थित होते.

Protected Content