बिनविरोध निवडणूक करणार्‍या ग्रामपंचायतींना २५ लाखांचा निधी-आ. अनिल पाटील

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर मतदार संघातील ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होतील, अशा गावांना २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केली आहे.

सन २०२०मध्ये मुदत संपलेल्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास तंटे उद्भवणार नाहीत व गावाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्‍वास व्यक्त करत आमदार पाटील यांनी २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा केली आहे.

याआधी आमदार चिमणराव पाटील व आमदार किशोर पाटील यांनी याच प्रकारच्या घोषणा केल्या आहेत. या पाठोपाठ आता आमदार अनिल भाईदास पाटील यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी २५ लाखांच्या निधीची केलेली घोषणा लक्षणीय मानली जात आहे.

Protected Content