मोठी बातमी ! मराठा समाजला मिळणार ‘इतके’ टक्के आरक्षण

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्य सरकारने येत्या 20 तारखेला एकदिवसीय अधिवेशन घेणार असल्याचं सांगितलं होतं. मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. मराठा आरक्षणाचा शब्द देत मुख्यमंत्र्यांनी तोंडाला पानं पुसल्याची टीका विरोधी पक्षातून होऊ लागली आहे. अशातच मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा मसुदा तयार केल्याची माहिती समजत आहे.

मराठा आरक्षणाचा मसुदा तयार झाला आहे. निवृत्त न्यायमूर्तींची या मसुद्यासाठी मदत घेतली होती. कोर्टात नवा कायदा टिकेल असं तज्ञांचं मत आहे. कुणबी वगळून आता राज्यात 32 टक्के मराठा समाज असल्याचं अहवालात म्हटलं गेलं आहे. मराठा समाजाला 13 आरक्षण मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.

Protected Content