पारोळा पोलिस स्थानकात प्रबोधनपर कार्यक्रम

पारोळा प्रतिनिधी । येथील पोलिस स्थानकात जादूटोणा आणि अंधश्रध्देबाबत प्रबोधन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक सिद्धेश्‍वर पोटे यांनी अंधश्रद्धा कायदा २०१३ पासून लागू होवूनही या कायद्याअंतर्गत विशेष गुन्हे दाखल होत नसण्यामागे या विषयावर प्रबोधन झाले नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच आजचा काळ हा इंटरनेटचा काळ असून अश्या गोष्टींना बळी न पडण्याचे आवाहन केले. तर श्रीकृष्ण पोटे यांनी याबाबत आपण पूर्ण राज्यात जनजागृती करत असल्याचे सांगून भोंदू प्रकार कसे फसवतात याबाबतचे अनेक प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखविले. याप्रसंगी श्रीकृष्ण पोटे, पोलिस उपनिरीक्षक सिद्धेश्‍वर पोटे, जितेंद्र खैरनार, अजितसिंग देवरे, कर्मचारी सुनील पवार, बापू पाटील, सुनील साळुंखे, पंकज राठोड यांच्यासह तालुक्यातील सर्व पोलिस पाटील, बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

Protected Content