प्रांताधिकारी पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील आगामी शासकीय योजनांची जत्रा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रांताधिकारी शरद पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.

येत्या ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान चाळीसगाव येथे महाराजस्व अभियान व विस्तारित समाधान योजना अंतर्गत शासकीय योजनांची जत्रा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने प्रांताधिकारी शरद पवार यांनी सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची बैठक तहसील कार्यालयात बोलवीली होती यावेळी विविध योजनांचा व योजना कशा पद्धतीने पोहोचवता येते यासाठी आढावा घेण्यात आला या बैठकीला अधिकार्‍यांसह स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका कृषी अधिकारी सी डी साठे , नायब तहसीलदार विशाल सोनवणे निवासी तहसीलदार नानासाहेब आगळे, एसटी डेपो व्यवस्थापक सुधीर निकम,सामाजिक वनीपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पवार यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी सचिन पवार , समकित छाजेड , गणेश काळे ,वाल्मीक महाले, सुनील पाटील ,इम्रान पठाण,अनिस शेख, लियाकत पठाण , दिनकर राठोड, बाजीराव आहिरे, समाधान राठोड, दीपक एरंडे, दीपक पाटील आदींची उपस्थिती होती.

खासदार उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शासकीय योजनांची जत्रा मध्ये आयुष्यमान भारत योजना ४२ हजार लाभार्थी पर्यंत पोहचविणे, ऑनलाईन फॉर्म भरणे, विहीर पुनर्भरण योजना, एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड पोखरा योजना, उमेद योजना , गोपीनाथ मुंडे अपघात विमा यासारख्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला. लवकरच विभाग निहाय बैठका घेऊन जत्रेच्या लाभाचा अधिकाधिक विस्तार करण्यासाठी जबाबदारी निश्‍चित करावी अशी सूचना स्वयं सेवकांनी मांडली.

या बैठकीत स्वयंसेवकांवर विविध जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या. यात सचिन पवार मुख्य समन्वयक तर गणेश काळे सहसमन्वयक अशी नियुक्ती करण्यात आली आहे. तर वाल्मिक महाले- एसटी बस स्मार्ट कार्ड योजना,आयुष्यमान भारत योजना; सुनील पाटील:-महिला व बालविकास योजना; शेख अनिस:-उज्ज्वला योजना; पठाण इमरान:-उज्वला योजना साहाय्यक; लियाकत पठाण:-महसूल विभाग; दिनकर राठोड :- महसूल विभाग; बाजीराव भगवान अहिरे:-पंचायत समिती योजना; समाधान सुरमल राठोड :-बांधकाम कामगार नोंदणी योजना; दीपक प्रकाश एरंडे:-कृषी-पोखरा योजना; दीपक पंडित पाटील:-शिक्षण विभाग योजना; समकीत छाजेड यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Protected Content