रोटरी क्लबतर्फे चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात पीपीई कीटचे वाटप

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रोटरी परीवारातर्फे चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयाला पीपीई कीटचे वाटप करण्यात आले. रोटरीचे प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी हे किट उपलब्ध करून दिले.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी शहरातील रोटरी परीवारातर्फे ग्रामीण रूग्णालयाला पीपीई कीट देण्यात आले. हे कीट राजेंद्र भामरे यांनी उपलब्ध करून दिले. यावेळी तहसीलदार, प्रांत, वैद्यकिय अधिकारी डॉ. देवराम लांडे, प्रमुख वैद्यकिय अधिकारी डॉ. बी.पी. बाविस्कर यांना प्रदान करण्यात आले. रोटरीने केलेल्या उपक्रमाबाबत वैद्यकिय अधिकाऱ्यांनी आभार मानले.

यांची होती उपस्थिती
यावेळी रोटरी क्लब ऑफ चाळीसगावचे अध्यक्ष डॉ. संदीप देशमुख, रोटरी मिल्कसिटीचे अध्यक्ष दिनेश ठक्कर, रोटरी संगमचे अध्यक्ष प्रशांत शिनकर, रोटरी मिलिनीअमचे अध्यक्ष संदीप जैन, राजेंद्र कटारिया, बाळासाहेब चव्हाण, सुधीर पाटील, गणेश बागड, प्रियेश कटारिया, सुनील गोपलानी, उमाकांत ठाकूर आदी उपस्थित होते.

Protected Content