चाळीसगावात किराणा, भाजीपाला दुकानांवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा (व्हिडीओ)

चाळीसगाव (दिलीप घोरपडे) । चाळीसगाव शहरात तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात आला होता. त्याला चाळीसगावकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज जनता कर्फ्यू संपल्यानंतर आज शहरातील किराणा, भाजीपाला घेण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग न पाळता नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पोलीस प्रशासन माजी सैनिक, होमगार्ड हे नागरिकांना सोशल डिस्टन पाळण्याचे आवाहन करीत आहेत तर काही ठिकाणी सौम्य प्रकारचा लाठी मार देखील करावा लागला.

चाळीसगाव १ ते ३ मे दरम्यान स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. तालुक्यासह शहरात कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्यात आला. आज ४ मे रोजी हा जनता कर्फ्यू संपल्यानंतर शहरात किराणा घेण्यासाठी भाजीपाला घेण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंग पाळताना लोक दिसून येत नसल्याने पोलीस प्रशासन, माजी सैनिक होमगार्ड हे नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आहवान करीत आहे, तर काही ठिकाणी सौम्य प्रकारचा लाठी मार देखील करावा लागत आहे.

कृउबा समितीतही गर्दी
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतमाल विक्रीसाठी देखील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात सुरु होणाऱ्या पावसाळ्यामुळे आपल्या घरातील शेत माल विकून पेरणी व मशागतीची कामे सुरू आहे. शेत माल विकणे अत्यंत गरजेचे असल्याने म्हणून शेतकरी वर्गाची कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी होत आहे या ठिकाणीदेखील बाजार समितीचे पदाधिकारी कर्मचारी व पोलीस बांधव शेतकऱ्यांना गर्दी कमी करून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करीत आहेत. मात्र प्रत्येक ठिकाणी मग तो किराणा दुकानावर असो भाजीपाला दुकानावर असो किंवा बाजार समितीमध्ये असो माझाच नंबर आधी लागावा या अपेक्षेतून नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला जात आहे. गेले तीन दिवस कडकडीत पाळलेल्या जनता कर्फ्यूवर विरंजन पडल्यासारखे जागरूक नागरीकांकडून बोलले जात आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/374718773420795/

Protected Content