अजगरास अमानुषपणे हाताळल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा

1168534d 1279 4e62 a8f5 918a08469bfd

एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल वनपरिक्षेत्रातील मौजे आव्हाणे (ता. धरणगाव) येथील शेतकरी जानकीराम दामोदर पाटील यांच्या शेतशिवार गट नं. २४ मध्ये उस तोडणीसाठी आलेल्या काही मजुरांनी १९ जुलै रोजी अजगरास अमानुषपणे हाताळून त्याची व्हीडीओ क्लीप व फोटो व्हाटस अॅपव्दारे प्रदर्शित केले, त्यावरुन वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ९, ३९, ४९, ४८/१ व ५० अन्वये गुन्हा नोंद करुन आज (दि.२४) त्यांना धरणगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि.२६ पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

 

अधिक माहिती अशी की, दि. १९/०७/२०१९ रोजी उस तोडणीसाठी आलेल्या निंबा त्र्यंबक पाटील, राजू रामदास नेतकर, किशोर प्रकाश पाटील, सुनिल एकनाथ माळचे, लहू लक्ष्मण मील सर्वजण रा. उडणी दिगर, पो. उंदिरखेडे, ता. पारोळा यांनी उस तोडणी करीत असताना अजगरास पकडून अमानुषपणे हाताळणी करुन त्यांचे व्हीडीओ क्लीप व फोटो व्हाटस अॅपव्दारे प्रदर्शित केले होते.

या कारवाईचे वन्यजीव प्रेमींनी स्वागत केले आहे. केशव फंड, सहाय्यक वनसंरक्षक रोहयो व वन्यजीव तथा वन्यजीव रक्षक व बाळासाहेब पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी एरंडोल, व राजेंद्र राणे वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन भुसावळ स्थित जळगाव, तसेच सुनिल पाटील, वनपाल पदमालय, प्रशांत पाटील वनपाल राजवड, नंदकिशोर क्षिरसागर वनरक्षक राजड, शिवाजी माळी वनरक्षक पदमालय, जगदीश पाटील वनरक्षक म्हसवे व योगेश देशमुख वनरक्षक एरंडोल, भागवत तेली, वनरक्षक धरणगाव व कांतिलाल पाटील, भगवान चिम, दिगंबर सुरळकर वाहन चालक यांनी ही कारवाई केली.

Protected Content