Home धर्म-समाज यावल वकील संघ अध्यक्षपदी अॅड निलेश मोरे यांची बिनविरोध निवड

यावल वकील संघ अध्यक्षपदी अॅड निलेश मोरे यांची बिनविरोध निवड

0
49


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. निलेश मोरे, सचिवपदी अॅड. दत्तात्रय सावकारे तर ग्रंथपाल म्हणून, यशवंत दाणी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

वकील संघाच्या बार असोशिएशन सभागृहात दि. १ जुलै रोजी आयोजित बैठकीत संघाच्या अध्यक्षपदी अॅड. निलेश मोरे, सचिवपदी अॅड. दत्तात्रय सावकारे तर ग्रंथपाल म्हणून, यशवंत दाणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी माजी अध्यक्ष अॅड. धीरज चौधरी, अॅड.के. डी. पाटील , अॅड. नितीन चौधरी, अॅड. अजय कुलकर्णी, अॅड. अशोक सुरळकर, अॅड. गोविंदा बारी , अॅड खालीद शेख, अॅड. उमेश बडगुजर , अॅड मोहित शेख , अॅड. देवेंद्र बाविस्कर, अॅड. स्वाती साठे, अॅड. विनोद परतणे, अॅड. गौरव पाटील, अॅड. सुलताना तडवी , अॅड. आकाश चौधरी, अॅड. हेमांगी चौधरी , यांच्यासह सभेला तालुक्यातील वकील मंडळी ही प्रामुख्याने उपस्थित होती. वकील संघाच्या नुतन कार्यकारणीची निवड ही कोणतीही निवडणुक न घेता मागील दहा वर्षापासुन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येते ही परंपरा वकील संघाने यावर्षी देखील कायम राखली आहे. वकील संघाच्या सभेचे सुत्रसंचालन अॅड ए. आर. सुरळकर यांनी केले तर संघाच्या निवड करण्यात आलेल्या नुतन कार्यकारणीचे वकील संघाच्या सर्व सदस्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.


Protected Content

Play sound