किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला पंचायत राज समितीने दिली भेट

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देताना पंचायती राज समितीने किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दूरदृष्टी आणि कामाच्या नियमिततेबद्दल समाधान व्यक्त केले.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय आधीकारी डाँ.मनिषा महाजन यांना कामकाजाबाबत विचारणा केली  पंचायत राज समितीचे गट प्रमुख व अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील  आमदार माधवराव जवळगावकर आमदार डॉ. देवराज होळी तसेच  विधानसभा अधिकारी व जिल्हा परिषद अधिकारी शशिकांत सांबारकर, देवेंद्र राऊत, मैत्रेय कुलकर्णी यांच्या आगमनाने पंचायत राज समितीचे कामकाज सुरू झाले.

तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य आर.जी.पाटील, गटविकास अधिकारी निलेश पाटील, किनगाव बुद्रूकच्या सरपंच निर्मला पाटील, ग्रामविकास आधीकारी व ग्राम पंचायत सदस्य इ.उपस्थीत होते. प्राथमिक आरोग्य केंन्द्राचे कामकाज तपासतांना डॉ.मनिषा महाजन यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत नसतांना देखील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंन्द्र आडगाव येथे एप्रिल पासून ते आजपर्यंत १२४ प्रसूती करून व मासिक ३८ प्रसूती करून जळगाव जिल्ह्यात उच्चांक गाठला असे नमूद केले. तसेच कुटुंब नियोजन मध्ये डॉ.महाजन यांनी प्रथम पारितोषिक मिळवले असून त्या मुख्यालयी हजर राहून स्वतः प्रसूती आणि तांबी बसवतात.

तसेच कोविड लसीकरणात आज पर्यंत ५७ दिवसात १८०११ नागरीकांचे लसीकरण केले. त्यात पहिला डोस चे ७३ टक्के तर तर दुसरा डोस चे २७ टक्के काम झालेले असून किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्राअंतर्गत आतापर्यंत ८ गावांना पहील्या डोसचे १०० टक्के लसीकरण झालेले आहे. तसेच कोरोना काळात व इतर राष्ट्रीय कार्यक्रम आणि त्यात पूर्ण केलेल्या कामाविषयी सविस्तर माहिती डॉ.मनीषा महाजन यांनी पंचायती राज समितीच्या सर्व सद्यस्य व अधिकारी यांना दिली. म्हणून प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा महाजन यांचे पंचायत राज समीतीच्या टीमने कौतुक केले व बांधकाम सुरू असलेल्या ग्रामीण रूग्णालयाच्या कामाची पहाणी केली.

यावेळी प्रा.आ.केंन्द्राचे व्दितीय अधिकारी डॉ.अमोल पाटील, आरोग्य साहाय्यीका उषा पाटील, आरोग्यसेविका कुमुदिनी इंगळे, कविता सपकाळे, मंगला सोनवणे, भावना वारके, शिपाई सरदार कानाशा डेटा एन्ट्री ऑपरेटर भुपेंद्र माळी, मदतनीस सुरेखा माळी, आशा सेविका निराशा जाधव, रेखा पाटील, दीपिका पाटील, सायदा तडवी, जयमाला अडकमोल, दुर्गा तायडे, सफाई कामगार निलेश कंदारी, वाहन चालक कुर्बान तडवी इ.उपस्थीत होते.

Protected Content