इंडियन नेव्हीच्या एस.एस.आर. पदी गौरव बोरसे

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील शिंदाड येथील गौरव बोरसे यांची इंडियन नेव्हीच्या एस.एस.आर. पदी निवड करण्यात आली आहे. या यशाबद्दल गौरवचे सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.

गौरव याचे वडील संजय बोरसे यांनी अहोरात्र परिश्रम करून गौरवचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली. गौरव याचे पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण नवोद्‌य महाविद्यालय भुसावल येथे झाले. गौरव याने नियमित सकाळ व संध्याकाळी कसरत करण्यासोबतच स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकांचे वाचन करून ज्ञात आत्मसात केले. बारावीनंतर लगेच गौरवने नेव्हीसाठी तयारी केली. गौरवच्या या जिद्द व चिकाटीने आज त्याची इंडियन नेव्ही मध्ये निवड झाली आहे. गावातील मुलांनी त्याच्या या निवडीचा आर्दष घेऊन त्यांनी सुद्धा शारीरिक कसरती करुन व पुस्तकी ज्ञान घेऊन यशाचे शिखर गाठावे असे मत गौरव याने व्यक्त केले. गौरव बोरसे हा लवकरच ट्रेनिंगसाठी चिल्का बेस (ओरिसा) येथे रवाना होणार आहे. गौरवचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

 

Protected Content