पारोळा प्रतिनिधी । राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना या पंचायत समिती स्तरावरून राबविल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी व माहितीचा आढावा घेण्यासाठी आज राज्याची पंचायत राज समिती सकाळी 11 वाजता पारोळा पंचायत समितीत दाखल झाली असून यावेळी तब्बल दोन तास आढावा घेण्यात आला.
सुरुवातीला या समिती सदस्यांचे सभापती रेखा भिल, उपसभापती अशोक पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर पंचायत समिती सभागृहात पंचायत राज समिती सदस्य कढून आढावा घेण्यात आला. पारोळा पंचायत समितीमध्ये गेला सहा महिन्यापूर्वी तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी एन आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली एम आर इ जी एस या योजनेअंतर्गत वृक्ष लागवडी मध्ये मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ केला गेला असल्याचे तक्रारी या करण्यात आले आहेत. तालुक्यातील या योजना अंतर्गत 1064 शेतकऱ्यांना फक्त शेवगा लागवडीच्या नियम धाब्यावर बसवून प्रशासकीय मान्यता या देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात अशा पद्धतीने कुठल्याही पंचायत समिती मध्ये ही योजना राबविली गेली नसताना फक्त पारोळा पंचायत समिती मध्येच इतक्या मोठ्या प्रमाणात ही योजना व शेवगा लागवड कशी काय केली जात आहे. असा प्रश्न उपस्थित करून यात मोठा अपहार झाल्याच्या तोंडी तक्रारी आहेत.
पंचायत राज समितीतील सदस्य आ किशोर पाटील व सदस्य यांनी तोच कळीचा धागा पकडून त्यावर या बैठकीत सखोल चर्चा व प्रश्नांची मालिका उपस्थित करून यासंदर्भात सविस्तर लेखी अहवाल देण्याच्या गटविकास अधिकारी विजय लोंढे यांना सूचना दिल्या आहेत. यामुळे संबंधित योजना कर्मचारी अधिकारी यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन खळबळ उडाली आहे. दरम्यान आजच्या आढावा बैठकीत समितीने विविध 28 विषयावर माहिती जाणून घेतली.त्यात शालेय पोषण व पुरक आहार सह गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी नियमानुसार किती शाळांना भेटी देऊन तपासणी केल्यात. त्यातून काय दोष व त्रुटी आढळून आल्या त्याचे निराकरण कश्या प्रकारे करण्यात आले. तसेच किती शाळांची पटपडताळणी करण्यात आली. बोगस विद्यार्थी किती आढळून आले. शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी काय कार्यवाही करण्यात आली. संदर्भात माहिती जाणून घेतली आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी बाबत तसेच कुपोषित बालकांची संख्या पोषण आहार,मुख्यलयी न राहणाऱ्या ग्रामसेवकवर काय कारवाई करण्यात आली. एका ग्रामसेवकाकडे किती ग्रामपंचायत कार्यभार आहे. आदी विषयी आढावा घेतला.
दरम्यान या आढावा बैठकीला सभापती रेखा भिल, उपसभापती अशोक पाटील यांना बसू देण्यात आले नाही. त्यांनी बसू नये असे बैठकीत सूचना देण्यात आली होती. यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत पंचायत राज समिती सदस्य आ. किशोर पाटील यांना दिव्य मराठी प्रतिनिधी यांनी थेट प्रश्न केला असता. त्यांची उपस्थिती ही संविधानिक नाही.अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शेळावे बु प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी पंचायत राज समितीचे सदस्य आ.म.सुभाष धोटे,आ.म.सौ.प्रतिभा धानोरकर,आ.किशोर दराडे,आ.किशोर पाटील व डी एस मोहन अतिरिक्त सी इ.ओ, यांचे समितीने दुपारी दीड वाजता शेळावे बु प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तालुका वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत सोनवणे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पथकाने प्रसूतिगृह ,शस्त्रक्रिया गृह ,दोन्ही वार्ड व प्रा केंद्राचा अंतर्बाह्य परिसरची पाहणी केली. तसेच औषध भांडार, औषध साठा रजिस्टर, औषध साठा नोंदवही, मुदत बाह्य नोंदणी रजिस्टर, कॅशबुक, ओपीडी रजिस्टर, प्रसूती रजिस्टर, सर्पदंश व श्वानदंश लसी बाबत वैद्यकीय अधिकारी प्रांजली पाटील यांच्याकडून आढावा घेतला.