सातोद येथे विहिरीत पडलेल्या कोब्रा जातीच्या नागाला सर्पमित्राकडून जीवदान

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सातोद येथील शेतकरी अमोल पाटील यांच्या शेतातील विहिरीत नऊ दिवसांपासून पडलेल्या कोंब्रा नागाला सर्पमित्रांकडून जीवनदान दिले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील सातोद येथील शेतकरी अमोल पाटील यांच्या सातोद शिवारातील शेतात असलेल्या विहिरीत कोब्रा नाग पडल्याचे दिसून आले. अमोल पाटील यांनी भुसावळ येथील अवनी बहुउद्देशीय संस्था यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यांनी तातडीने सर्पमित्राचे पथक सातोदला रवाना झाले. या पथकात ॲलेक्स फ्रेसडी, रवी तायडे, दीपक नाटेकर, दीपक वाघ, कल्पेश तायडे, रोहित श्रीवास्तव, राहूल आराक, पंकज वाघमारे यांनी शर्तीचे प्रयत्न करून विहिरीत पडलेल्या कोबा नागाला सुखरूप बाहेर काढले. त्याला सातपुडा जंगलात सोडून देण्यात आले. यावेळी नागाला पकडण्यासाठी आलेल्या सर्पमित्रांची कामगिरी पाहण्यासाठी नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. यावेळी शेतकरी अमोल पाटील व ग्रामस्थांनी  सर्व सर्प मित्रांच्या पथकाचे कौतुक केले. कोणत्या ही सर्पाला मारू नका, सर्प हे शेतकऱ्यांचा मित्र आहेत. तुम्हाला कुठे सर्प दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा दीपक नाटेकर यांनी केले आहे.

 

Protected Content