चुंचाळे येथे आत्मा अंतर्गत शेती कार्यशाळेचे आयोजन

karyshala

चोपडा प्रतिनिधी ।  तालुक्यातील चुंचाळे येथे कृषी विभाग ,आत्मा व श्री समर्थ सेंद्रिय शेती गट यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गटाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गटाच्या सदस्यांसोबत चर्चा करण्यात आली. या शेती कार्यशाळेस जिल्हा कृषी विभागाचे पुढील पदाधिकारी उपस्थित होते. यात पुणे सहसंचालक कृषी आयुक्त कार्यालय येथील श्री. कुलथे साहेब, प्रकल्प संचालक कृषी अधीक्षक कार्यालय जळगाव येथील अनिल भोकरे, अमळनेर येथील उपविभागीय कृषी अधिकारी जाधवर, चोपडा तालुका कृषी अधिकारी पांडुरंग चौधरी, चोपडा आत्मा समन्वयक महेंद्र साळुंखे, कृषी पर्यवेक्षक सुनील गुजराथी ,दिनेश पाटील व महेश सनेर, कृषी सहाय्यक दिपक पाटील,मंडळ अधिकारी आर.एम. पाटील, गटाचे अध्यक्ष नितीन चौधरी, उपाध्यक्ष अमरनाथ चौधरी तसेच प्रगतशिल शेतकरी अवधुत महाजन उपस्थित होते.

Protected Content