हिंगोणा येथे लघुपटर्निमितीतून आठ पारितोषिकं मिळवणाऱ्या कलाकारांचा गौरव

यावल प्रतिनिधी | हिंगोणा गावातील लघुपटा र्निमिती करून आठ पारोतोषिक मिळवणाऱ्या कलाकारांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तालुक्यातील हिंगोणा या गावातील कलाक्षेत्रात कामगिरी करत त्यांच्या ‘थॉट्स’ या लघुपटाला आठ पारितोषिक मिळाल्याबद्दल आकाश तायडे आणि संगीत भालेराव यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे .

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत हिंगोणा या गावी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आकाश तायडे आणी संगीत भालेराव यांचे शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार केले आणि त्यांना कला क्षेत्रातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

यावल तालुक्यातील एका छोटयाशा गावातुन जन्माला येवुन लघुचित्रपटाची निर्मिती करून यात उत्कृष्ठ कामगिरीसाठी आठ वेगवेगळे पारितोषिक मिळवल्याबद्दलची ही कलावंतांची कामगीरी खूप अभिमानास्पद गोष्ट असल्याचे म्हणत कलाकारांचा उत्साह वाढून नवनवीन कलाकार निर्माण व्हावे या अनुषंगाने त्यांचा महाराष्टू नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून गौरव सत्कार करण्यात आल्याचे मनसे जनहित जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर, तालुका उपाध्यक्ष शाम सुरेश पवार व अनिल सपकाळे, मनसेचे यावल शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, यावल शहर उपाध्यक्ष आबिद कच्छी यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content