सागवानची वृक्षतोड थांबविण्यात अकार्यक्षम ठरलेले वनपाल, वनसंरक्षक व वनमजूर निलंबित

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पश्चिम वन विभागातील तीन कर्मचारी हे सातपुडा जंगलातील होणारी वृक्षतोड थांबविण्यात अकार्यक्षम ठरल्याने त्यांना निलंबित करण्यात आले असल्याची घटना घडली आहे. वाघझिरा वन क्षेत्रातील वृक्षतोडी संदर्भात सर्वप्रथम ‘लाईव्ह ट्रेड न्युज’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.

यावलच्या सातपुडा जंगलातील पश्चिम वनविभागाच्या वाघझिरा परिमंडळात गेल्या दोन महिन्यात मौल्यवान वृक्षतोड रोखण्यात अकार्यक्षम ठरलेल्याच्या कारणावरून वाघझिरा बीटचे वनपाल वनरक्षक व एकावन मजुरास अशा तीन जणांना वनविभागाने निलंबित केले आहे.

येथील पश्चिम वनविभागांतर्गत सातपुड्यातील मोल्यवान सागवानी वृक्षासह अन्य वृक्षतोड रोखण्यास अकार्यक्षम ठरल्याचे कारणावरून वनविभागाने वाघझिरा बिटचे वनपाल राजेश शिंदे, वनरक्षक डी वाय नलावडे वनमजूर काशिनाथ बेलदार अशा तिघांना तडकाफडकी निलंबनांची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती पश्चिम वनक्षेत्राची वनपरिक्षेत्रपाल एस.टी.भिलावे यांनी दिली आहे.

यावलच्या सातपुडाजंगलातील वन विभागातील कार्यक्षेत्रात मागील काही महिन्यापासून सागवानी वृक्षासह इतर मौल्यवान वृक्षाची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच सागवानी लाकडाचा, अवैध व्यवसाय वन, विभागाच्या आशीर्वादाने जोमात सुरू असल्याची तालुक्यात चर्चा आहे. एकेकाळी घनदाट वनराईने असलेला सातपुडा सध्या बोडखा झालेला आहे.

Protected Content