सिडकोकडून पोलिसांसाठी ४,४६६ घरांच्या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

नवी मुंबई वृत्तसंस्था । ‘पोलिस अविरतपणे दिवस-रात्र आपल्या जीवाची आणि परिवाराची पर्वा न करता आपल्या संरक्षणार्थ उभे असतात. अशा पोलिसांना हक्काचे आणि स्वप्नातले घर सिडकोच्या या गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आज पोलिसांसाठी असलेल्या ४,४६६ घरांच्या योजनेचा शुभारंभ झाला

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील ३,७६० यशस्वी अर्जदारांना घरांचे ऑनलाईन वाटप, तसेच व्हर्चुअल निवारा केंद्राचे आणि खारघर हेवन हिल्स प्रकल्पाचा शुभारंभ या कार्यक्रमाच मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. सिडकोतर्फे सदनिकांच्या सोडतीतील विविध टप्प्यांत जसे व्हर्च्युअल निवारा केंद्र आणि ऑनलाईन माध्यमातून वाटपपत्र प्रदान करणे यांसारख्या प्रणाली आणि प्रक्रियांमधून उच्च दर्जाची पारदर्शकता राखण्यात येत आहे. ही पारदर्शकता अजोड असून अनुकरणीय आहे.

त्याचबरोबर सिडकोतर्फे निसर्गाच्या सान्निध्यात साकारण्यात येत असलेल्या खारघर हेवन हिल्स प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन वृक्षांची लागवड करुन निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे हिल स्टेशन साकारला जाणे ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. याशिवाय, सिडकोतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी रुपयांची करण्यात आलेली मदत अतिशय महत्वपूर्ण असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

आपले स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाने उराशी बाळगलेलं एक स्वप्न असते. पोलीसदेखील यापेक्षा वेगळे नाहीत. त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आज सिडकोच्या या गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. ब्रिटीशांच्या काळात महाराष्ट्रात अनेक हिल स्टेशन्स साकारली गेली. परंतु, त्यानंतर खारघर हेवन हिल्स प्रकल्पाच्या माध्यमातून निसर्गाचा समतोल राखून असे हिल स्टेशल सिडकोतर्फे साकारण्यात येत आहे. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Protected Content