कंत्राटी वैद्यकिय अधिकाऱ्यांचे रखडले सात महिन्यांपासून वेतन

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. गेल्या सात महिन्यांपासून वेतन रखडल्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न या वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हाभरातील तब्बल 87 वैद्यकीय अधिकारी रखडलेल्या पगाराच्या प्रतीक्षेत आहेत.

कोरोनाच्या काळात ग्रामिण भागातील आरोग्य यंत्रणेवर जिवाची बाजी लावून काम करणाऱ्या कंत्राटी वैद्यकिय अधिकारी यांना फेब्रुवारी महिन्यापासून मासिक वेतन मिळाले नाही. जिल्ह्याभरात असे ८७ कंत्राटी वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहेत. ग्रामिण भागात वैद्यकिय सेवा देत असताना सात महिन्यांपासून वेतन नसल्याने या कंत्राटी वैद्यकिय अधिकाऱ्यांना प्रपंच चालविणे कठीण झाले आहे.

या संदर्भात आमदार संजय सावकारे व भाजप वैद्यकिय आघाडी उत्तर महाराष्ट्राचे सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन या वैद्यकिय कर्मचाऱ्यांना तातडीने वेतन दिले जावे, अशी मागणी केली आहे.

 

 

 

Protected Content