बामणोद येथे श्री एकविरा देवी मंदीरात प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचे आयोजन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बामणोद येथील श्री एकविरा देवी मंदीरात प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचे आयोजन सोमवारी ४ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. या निमित्ताने चार दिवस चंडीयागाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील बामणोद परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या श्री एकविरा मातेच्या मुर्तीचे प्राणप्रतिष्ठान सोहळा सोमवारी ४ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. ४ एप्रिल रोजी एकविरा मातेची ग्राम प्रदक्षिणा संध्याकाळी ४ ते ७, ५ एप्रिल रोजी रोजी सकाळी गणपती पूजन पुण्याहवाचन, पिठस्थ देवता स्थापना दुपारी १.३० ते ४.३० सप्तशतीपाठ नंतर स्थापित देवता पूजन, मूर्तीस –जलादिवास,धान्यादिवास, शैयादिवास व आरती.  ६ एप्रिल रोजी स्थापित देवता पंचोपचार पूजन देवी मूर्तीस दशविधीस्नान व प्राणप्रतिष्ठा मुहूर्त सकाळी ९ .३० ते १० .३० नंतर देवतांना महाअभिषेक दुपार १ पासून सप्तशतीपाठ हवन व संध्याकाळी आरती.  ७ एप्रिल रोजी स्थापित देवता पंचोपचार पूजन स्थापित देवतांचे हवन बलिदान, पूर्णाहुती व आरती दुपारी महाप्रसाद असे कार्यक्रमाचे नियोजन आहे. तरी देणगीसाठी व चंडीयागाच्या पूजेसाठी  विलास सुपडू फिरके (पुजारी) व  रमेश गणपत सोनवणे (ट्रस्टी) यांना भेटावे असे आवाहन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी स,गु.स्वामी गोविंदप्रसाददासजी जळगाव,व स.गु.शास्त्री पुरुषोत्तम प्रकाशदासजी, सुरत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तरी भाविकांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन विश्वस्तांकडुन करण्यात आले आहे.

Protected Content