कोरपावलीची ग्रामसभा संपन्न

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीने घेतलेल्या मागील ऑनलाईन ग्रामसभा रद्द केल्यानंतर आज ग्रामसभा यशस्वीरित्या ऑफलाईन पद्धतीने पार पडली.

यावेळी ग्रामपंचायत समोरील गावाच्या चौकात सरपंच  विलास अडकमोल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभा ग्रामस्थांची उपस्थिती ही लक्ष वेधणारी होती. या ग्रामसभेचे सचिव म्हणून ग्रामसेवक आर डी बाविस्कर यांनी काम पाहिले.  या ग्रामसभेचे सूत्रसंचालन आदीवासी सामाजीक कार्यकर्ते मूनाफ जुम्मा तडवी यांनी केले. सुरुवातीला प्रभारी ग्रामसेवक आर.डी. बाविस्कर यांनी अजिंठ्यावरील विषय सर्वांसमोर वाचून दाखविले. सदरील विषय हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी असून हे विषय पूर्णपणे सोडविण्याच्या दृष्टीतून ग्रामस्ताना आश्वासन दिले. सामाजिक कार्यकर्ते मूनाफ तडवी यांनी सर्वानुमते हिताचे प्रश्न सभेस मांडून सर्वांना त्या विषयाचे महत्व पटवून दिल्याने ही ग्रामसभा अगदी खेळीमेळीचे वातावरणात नव्या तरूण पिढीला आदर्श देणारी अशी स्थिती निर्माण झाली.

सभेस शबरी घरकुल योजनेतून प्रत्येक वंचीत लाभार्थ्यांना लाभ मिळावा व कोरपावली गावात आदीवासी तडवी समाज मंदिर उभारणीसाठी आमदार निधी व खासदार निधीतून  ग्राम सभेच्या ठरावानुसार निधी उपलब्ध करून देण्याकरीता विनंती करण्यात आली, त्याच बरोबर गावातील अगदी जिर्ण झालेली व पुरातन काळातील सार्वजनिक ठिकाणी असलेले जलकुंभ ( पिण्याच्या पाण्याची टाकी ) ही जीर्ण अवस्थेत असून ती कुठल्याहीक्षणी कोसळण्याची शक्यता असुन तसे झाल्यास मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे महत्वाचे प्रश्न देखील ग्रामसभेत ग्रामस्थांनी लक्षात आणून दिले.

कोरपावली गावातील आदिवासी समाज बांधवांची लोकसंख्याही पन्नास टक्केच्या वर असून या ठिकाणी शबरी योजने अंतर्गत ठक्कर बाप्पा योजनेचा लाभ मिळावा. यावर सर्वानुमते विचार करून ठराव मंजूर करण्यात आला. मजूर वर्गाला कायमस्वरूपी काम मिळावे मंजुरी देण्यात आली. पंधरा वित्त आयोगाची उर्वरित रक्कम मागील आरक्षणानुसार खर्च करण्यात यावी. उर्वरित रक्कम अकरा वित्त आयोगात समाविष्ट करण्यात येऊ नये, ते बेकायदेधीर  आहे, असे ग्रामसेवक यांनी भर सभेस ठणकावून सांगितले. मागील पंचवार्षिक ग्राम सभेत १९८ पंतप्रधान आवास योजनेचे मंजूर घरकुलाच्या लाभापासुन वंचीत राहिलेले ४४ असे लाभार्थ्यना तात्काळ लाभ घ्यावा, अशी विनंती करण्यात आली.

या ग्रामसभेला अब्दुल तडवी, गफूर तडवी, सिकंदर तडवू, नारायण अडकमोल, रवींद्र तायडे, फिरोज तडवी, ग्राम पंचायत, हमीदाबी पटेल, ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी, दगडू पटेल, सिकंदर तडवी, अफरोज पटेल, सर्फराज तडवी, सुनील अडकमोल, रोशन तडवी, भारती नेहेते, सपना जावळे, आरिफ तडवी, पिरण पटेल, युवा सामाजीक कार्यकर्त मुक्तार पटेल, सलीम तडवी, अफशान तडवी, हुरमत तडवी यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थांनी उपस्थीतीत होते. ग्राम पंचायतच्या ग्रामसभेला गालबोट लागू नये, म्हणून पोलीस अमलदार अस्लम शेख, पोलीस अमलदार सिकंदर तडवी यांच्या नियंत्रणाखाली बंदोबस्तात ग्राम सभा खेळीमेळीच्या व शांततेच्या वातावरणात पार पडली.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!