सावद्यात गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील चिनावल गावात रॅपिड ऍक्शन फोर्स, आर.सि.पी. प्लाटून, सावदा पो.स्टे.चे कर्मचारी आणि होमगार्ड यांचा रूट मार्च आज दुपारी २ ते २ :३० वाजेच्या दरम्यान काढण्यात आला.

दरम्यान, रॅपिड ऍक्शन फोर्स कंपनीचे शशिकांत राय डेपोटी कमांडंट यांचे उपस्थितीत घेण्यात आला. सदर रूटमार्च सुरु होण्या आधी चिनावल गावाचे व सावदा शहराचे महत्व संवेदनशील भागाची , मिस्त्र वस्ती  व जास्तीत जास्त गणपती स्थापना झालेल्या भागाबाबत रूट मार्च चे महत्त्व समजाऊन सांगून सदरचा रूट मार्च हा सावदा बस स्टँड येथून सुरू केला. शहरातील संवेदनशील भागातील शेखपुरा, चाँदणी चौक, शनी मंदिर, ख्वाजा नगर, जमादार वाडा, संभाजी चौक, गांधी चौक गवत बाजार, बडा आखाडा, शिवाजी चौक, मोठा आड, इंदीरा गांधी चौक, महाविर चौक मार्गे पुन्हा बस स्टँड येथे संपविला आहे. सदर रूट मार्च मध्ये रॅपिड ऍक्शन फोर्स चे ०१ पोलीस निरीक्षक, ०८ पोलीस अधिकारी, एकूण ८१ कर्मचारी तसेच   सावदा पो.स्टे.चे दुय्यम अधिकारी, १८पो अंमलदार, आर.सि.पी. प्लाटून,व ३० होमगार्ड उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!