बेलदारवाडी येथे जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा; ५ जणांवर गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बेलदारवाडी येथील शामवाडी रस्त्यावर अवैधरित्या जुगार खेळणाऱ्यांवर चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. यात ५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर असे की,  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी पुकारण्यात आलेली असताना. तालुक्यातील बेलदारवाडी येथील शामवाडी रस्त्यालगत सार्वजनिक जागेवर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून ग्रामीण पोलीसांना सोमवार, ३ मे रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास मिळताच. लागलीच सदर ठिकाणी छापा टाकून आरोपीच्या अंगझडतीतून ५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस कर्मचारी भगवान रामचंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून ईश्वर गोरख कुमावत, गणेश चंद्रसिंग शेर, समाधान साहेबराव कुमावत, निलेश ईश्वर कुमावत व दिपक चंद्रकांत कुमावत सर्व रा. बेलदारवाडी ता. चाळीसगाव या पाच जणांवर रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आले. हि कारवाई ग्रामीण पोलीसांनी केली असून पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोहेकॉ किशोर सोनवणे हे करीत आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.