मल्हार हेल्प फेअरला प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । लाईफ इज ब्युटिफुल फाऊंडेशन आयोजित मल्हार हेल्फ फेअरला आज सायंकाळी प्रारंभ करण्यात आला.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याहस्ते मल्हार हेल्प फेअरचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, आमदार किशोरआप्पा पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, दलूभाऊ जैन, रेड स्वस्तिक सोसायटीचे राज्य सचिव अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

लाईफ इज ब्युटिफुल फाऊंडेशन आयोजित सेवाकार्याचा कुंभमेळा अर्थात मल्हार हेल्प फेअर २ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सलग दुसर्‍या वर्षी दि. ०२ ते ०४ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये गरजवंतांची सेवा करणार्‍या जळगाव जिल्ह्यातील सेवाभावी संस्था व सेवादूत यांच्या कार्यासह शासकीय योजनांचीही माहिती मिळणार आहे.

तत्पूर्वी हेल्प फेअर २च्या जगजागृतीसाठी शनिवारी सकाळी काढलेल्या रॅलीला उत्तम प्रतिसाद लाभला. सागर पार्क येथून रॅलीला सुरुवात होऊन गांधी उद्यानाजवळ समारोप झाला. रॅलीचे उदघाटन ज्योती जैन यांच्या हस्ते तर भारती रायसोनी, डॉ. नलिनी मल्हारा, मनीषा मल्हारा, आनंद मल्हारा यांच्या उपस्थित झाले. याप्रसंगी कृती फाऊंडेशनने पथनाट्य सादर केले.

Add Comment

Protected Content