रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना शिक्षा द्या’ – पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलीसांना निवेदन

पाचोरा, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी चेअरमन रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना शिक्षा द्या’ अशा आशयाचे निवेदन पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसचे पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक किसनराव नजन पाटील यांना दिले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी चेअरमन ‘रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेध व्यक्त करत आरोपीना लवकरात लवकर शिक्षा व्हावी’ यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक किसनराव नजन पाटील यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन तावडे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, राष्ट्रवादी शहर प्रमुख अझहर खान, जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, नाना देवरे, डॉ. पी. एन. पाटील, रणजित पाटील, नगरसेवक अशोक मोरे, सुचेता वाघ, नीलिमा पाटील, बशीर बागवान, महिला तालुका अध्यक्षा रेखा देवरे, सुनीता देवरे, वैशाली बोरकर, जयश्री मिस्तरी, सुरेखा पाटील, प्रमिला वाघ, श्रध्दा गायकवाड, दत्ता बोरसे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अभिजीत पवार, पिंटू भामरे, हारून देशमुख, सुदाम वाघ, प्रकाश पाटील, सुदर्शन सोनवणे, ए. बी. अहिरे, सतिष चौधरी, डी. एस. आप्पा, जनार्धन पाटील, दिनेश पाटील, नितीन माने, भगवान मिस्तरी, सत्तार पिंजारी, राहुल राठोड, गौरव वाघ, गौरव शिरसाठ, किशोर डोंगरे, गणेश पाटील, गणेश पाटील, नितीन पाटील यासह पदाधिकारी आणि कार्यर्कत्यांची उपस्थिती होती.

Protected Content