पालघरचे खासदार राजेंद्र गावित शिंदे गटात दाखल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पालघरचे शिवसेना पक्षाचे खासदार राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.

शिवसेनेत उभी फूट पाडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यांच्या सोबत शिवसेनेचे ४० तर अपक्ष १० असे एकूण ५० आमदारांचे पाठबळ आहे. दरम्यान, शिंदे यांच्या सोबत काही खासदार तसेच अनेक माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते जाण्याची शक्यता आहे. मध्यंतरी मातोश्रीवर खासदारांची बैठक झाली. यात बहुतांश खासदारांनी पक्षाने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत उध्दव ठाकरे यांनी त्यांना पाठींब दिला आहे. यामुळे खासदारांचे संभाव्य बंड शमेल असे वाटत होते. मात्र असे झाले नसून राजेंद्र गावित यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे.

काल रात्री पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दर्शविला. याच कार्यक्रमात पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांची देखील उपस्थिती होती. अर्थात, त्यांनी आता जाहीरपणे एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याचे दिसून येत आहे.

Protected Content