विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झालेले माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिवसेनेत उभी फूट पाडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यांच्या सोबत शिवसेनेचे ४० तर अपक्ष १० असे एकूण ५० आमदारांचे पाठबळ आहे. दरम्यान, शिंदे यांच्या सोबत काही खासदार तसेच अनेक माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते जाण्याची शक्यता आहे. यात आधीच पुरंदरचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आधीच एकनाथ शिंदे यांची स्तुती करत त्यांच्या सोबत जाण्याचे संकेत दिले होते.

या अनुषंगाने विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची घोषणा दैनिक सामनातून करण्यात आली आहे. त्यांना शिवसेनेतील प्रवक्ते पदावरूनही हटविण्यात आले आहे. विजय शिवतारे हे पुरंदरमधून २०१४ साली निवडून आले होते. त्यांना नंतर जलसंधारण राज्यमंत्री म्हणून देखील संधी मिळाली होती. आता मात्र त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे.

Protected Content