पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे झालेल्या गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड बॅक रेकॉर्ड मध्ये पहूर ता.जामनेर येथील अर्णव मनोज जोशीने बँकवर्ड स्केटिंग स्पर्धेत विश्व विक्रम केला असून त्याच्या खेळाची नोंद गिनीज वर्ल्ड बुक मध्ये करण्यात आली आहे. या चमकदार कामगिरीने पहूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून जागतिक स्तरावर पहूर व जामनेर चे नाव झळकले आहे.तो लाँर्ड गणेशा इंग्लिश मेडियम स्कुलचा विद्यार्थी आहे.
शिव गंगा रोलर स्केटिंग क्लब बेळगाव यांच्या वतीने मे अखेरीस कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे दि २७ मे ते ३१दरम्यान रेकॉर्ड स्पर्धा आयोजित केली होती. तेरा वर्षीय अर्णवने यात सहभाग नोंदवून १०० मीर्टस मध्ये १४.८४ सेकंदाचे बँक स्केट मध्ये नवीन रेकॉर्ड करून सतत ७५तास दोन चाकांची इनलाईन स्केटिंग चालवून रेकॉर्ड पूर्ण करीत गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विक्रमी नोंद केली आहे. त्यांच्या चमकदार कामगिरीने जागतिक पातळीवर विक्रम नोंदविला गेला आहे. नुकताच याचा निकाल आयोजकांनी जाहीर केला आहे. त्याच्या या कामगिरी वेगळा ठसा उमटविला आहे. अर्णव सह जामनेर येथील सात खेळाडूंनी सहभाग नोंदवून गिनीज बुक वर्ल्ड मध्ये विश्व विक्रमाची नोंद केली आहे.
अर्णव जोशी हा पहूर येथील पत्रकार मनोज जोशी यांचा मुलगा आहे. या साठी डायनॅमिक स्केटिंग चे प्रशिक्षक आनंद आर.मोरे यांचे मार्गदर्शन। त्याला लाभले आहे. या बद्दल लाँर्ड गणेशा इंग्लिश मेडियम स्कुलचे अध्यक्ष हेमंत ललवाणी, उपध्याक्ष पिंटू चिप्पड,सचिव अभय बोहरा, सहसचिव दिपक पाटील, राहूल साबद्रा, मुख्याध्यापक धनंजय सिंग, प्रशासकीय प्रमुख सतिष मोरे, प्रशिक्षक आनंद मोरे यांनी कौतुक केले आहे.