लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली दलालांकडून महिलांची लूट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याच्या अर्थसंकल्पात महिला अग्रस्थानी ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून कागदपत्रांसाठी राज्यातील ‘लाडकी बहिण’ची दलालांकडून आर्थिक लूट होत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस आले आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यानंतर मंगळवार दि. २ जुलैपासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी १५ जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीत लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच, सोलापुरातील केंद्रावर एजंटकडून ८०० ते १००० रुपये घेतले जात असल्याचे समोर आले आहे.

Protected Content