जम्मू-काश्मीरमधील ऐतिहासिक सिटी चौकाचे नामांतर ‘भारत माता चौक’ !

श्रीनगर (वृत्तसंस्था) केंद्रशासित जम्मू-काश्मीरमधील ऐतिहासिक सिटी चौकाचे नाव ‘भारत माता चौक’ तर सर्क्यूलर रोडवरील चौकाचे नाव ‘अटलजी चौक’ असे ठेवण्यात आले आहे. जम्मू महापालिकेच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. तर काही नागरिक नाराज आहेत.

नाव बदलण्यात आलेल्या जम्मू चौकाचा मोठा इतिहास आहे. या चौक परिसरात बाजार आहे. त्यामुळे या चौकाशी अनेकांचा रोजगार जुडला आहे. त्यामुळे महापालिकेने चौकाचे नाव बदलण्यापेक्षा विकास आणि स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिलं तर बरं होईल, असं नाराज नागरिकांचे मत आहे. जवळपास चार महिन्यांपूर्वी महापालिकेच्या सर्वसामान्य सभेत याबाबत प्रस्ताव मांडला गेला होता. अखेर हा प्रस्ताव मान्य झाला. त्यामुळे सिटी चौकाचं नाव आता भारत माता चौक करण्यात आले आहे.

Protected Content