प्रति पंढरपूर त्रिविक्रम मंदिर यंदाच्या आषाढी एकादशीला राहणार बंद

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । शेकडो वर्षांची परंपरा खंडीत करून येथील प्रति पंढरपूर म्हणून गणले जाणारे भगवान त्रिविक्रम यांचे मंदिर यंदा पहिल्यांदाच आषाढी एकादशीला बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्वच मंदिरे देव दर्शनासाठी बंद आहेत. यावर्षी आषाढी एकादशीला गावातील व बाहेर गावाहून येणार्‍या भक्तांना मंदिरे बंद असल्याने भगवान त्रिविक्रमाचे दर्शन घेता येणार नाही, दर्शन बारी लावता येणार नाही, तसेच पालखी सोहळा व रात्रीचे कीर्तन सुध्दा होणार नाही. शेंदूर्णी गावांत ५ कोरोना संसर्ग रुग्ण मिळून आलेले आहेत त्यामुळे रुग्णांची साखळी खंडीत होण्यासाठी स्वयंस्फूर्तीने रविवार दिनांक २८ जून ते बुधवार १ जुलै पर्यंत गावांत लॉक डाउन व कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. याची दखल घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन शांतता कमिटीचे सभेत करण्यात आले आहे.

शेंदुर्णी गावात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या पाच वर पोहचल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. शेंदूर्णी खान्देशचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते,येथिल भगवान त्रिविक्रमाचे आषाढीला दिवसातून ३ वेळा दर्शन घेतल्यास साक्षात पंढरीची वारी घडते श्रीविठ्ठल, पांडुरंग पावतो अशी श्रद्धा आहे. आषाढीला तर हजारो भक्त शेंदूर्णी येथे पायी दिंडी व मिळेल त्या वाहनाने दर्शनासाठी रीघ लावतात. त्यामुळे आषाढीचे दिवशी गावांसाठी महोत्सव असतो. गावात श्रद्धेचा मळा फुलतो. ही शेकडो वर्षाची परंपरा या वर्षी खंडित होणार आहे. येथील भगवान त्रिविक्रम मंदिर,संत कडोबा महाराज मंदिर ,राम मंदिर सह सर्व मंदिरे बंद आहेत म्हणून कोणीही आषाढी एकादशीला शेंदूर्णी येथे देव दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन शेंदूर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, पहुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, सहाय्यक उपपोलिस निरीक्षक किरण बर्गे, शेंदूर्णी दुरक्षेत्राचे पो.ना. किरण शिंपी, प्रशांत विरणारे यांनी केले आहे.

Protected Content