क्षुल्लक कारणावरून बाप-लेकास मारहाण

पहूर. ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे क्षुल्लक कारणावरून बाप-लेकास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर बस स्थानक परिसरात संतोष नामदेव चिंचोले यांच्या मालकीचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. या दुकानावर सोमवारी दुपारी रोहित दिपक थोरात उर्फ चिक्या याने दुकानावर येऊन त्यांचा मुलगा दीपक संतोष चिंचोले यास काहीतरी टणक वस्तूने डाव्या बाजूच्या बरगडी व दंडावर पायावर मारहाण करून जखमी केले तसेच संतोष नामदेव चिंचोले ( वय ६४ ) यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून केल्याची घटना घडली आहे.

दरम्यान, या मारहाणीत जखमी झालेल्या दीपक संतोष चिंचोले यांना पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याबाबत संतोष नामदेव चिंचोले यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रोहित दिपक थोरात उर्फ चिक्या याचे विरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गु.र.ण. ९७ /२०२२ भादवि कलम ४५२ ,३२४, ४२७ ,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरत लिंगायत तपास करीत आहेत.

Protected Content