शेंदूर्णी प्रतिनिधी- पहुर पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यावर पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी आज पहुर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेंदूर्णी दुरक्षेत्रास भेट देऊन येथिल दप्तर तपासणी केली व परिसराची माहिती जाणून घेतली. पहुर पोलिस स्टेशनमध्ये नव्याने प्रथमच पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांची जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचे आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पहुर पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यावर आज त्यांनी पहुर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेंदूर्णी दुरक्षेत्रास भेट देऊन येथिल दप्तर तपासणी केली व परिसराची माहिती जाणून घेतली व गुन्ह्याची माहिती जाणून घेतली. तसेच पोलिस दुरक्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी पोलिस निरीक्षक यांनी पोलिस दुरक्षेत्राचे निरीक्षण वेळी विविध लेखे व दप्तर तपासणी केली व दुरक्षेत्रातील कामकाजा विषयी समाधान व्यक्त केले. यावेळी पोलीस नाईक किरण शिंपी, प्रशांत विरणारे, गजानन ढाकणे व होमगार्ड उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष श्रीराम काटे ,पत्रकार विलास अहिरे यांनी पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांचा सत्कार केला. सामाजिक कार्यकर्ते सुनील गरूड उपस्थित होते.यावेळी पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी शेंदूर्णी गावातील राजकीय व सामाजिक परिस्थिती विषयी माहिती जाणून घेतली. शेंदूर्णी नगरपंचायतचे भाजपचे नगरसेवक शरद बारी व त्यांचे मित्र परिवाराचे वतीनेही पोलिस निरीक्षक खताळ यांचा सत्कार करण्यात आला.