ग्रंथालय संघटनेचे थकित वेतनासह इतर मागण्यांसाठी तहसिलदारांना निवेदन

पाचोरा प्रतिनिधी । राज्यातील ग्रंथालयांचे थकीत वेतन मिळावे यासह कनिष्ठ कर्मचारी वेतन वृद्धीसाठी महाराष्ट्र ग्रंथालय सेनाच्या वतीने पाचोरा येथे तहसीलदार कैलास चावडे यांना विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच देण्यात आले आहे.              

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी यांना कोविड-१९  च्या  काळात एप्रिल ते सप्टेंबर २०२० या कालावधीच्या पगार देण्याकरिता वर्ष २०२० ते २०२१ (वेतनवर) ग्रंथ खरेदी खर्च करण्यास विशेष बाब म्हणून शासनाने निधी मंजूर करून द्यावा, या प्रमुख मागण्या निवेदनात समावेश आहे.

यावेळी निवेदन देण्यासाठी  महाराष्ट्र ग्रंथालय सेना जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील पाचोरा तालुकाप्रमुख अरुण पाटील, अनिल पाटील, वसंतराव पाटील (घुसर्डी), तालुका उपप्रमुख विश्वनाथ पाटील (घुसर्डी), डॉ. यशवंत पाटील (खडकदेवळा), महेंद्र पाटील (गाळण), रवींद्र परदेशी, संजय क्षत्रिय, भास्कर पाटील (सार्वे), शरद पाटील, आर. व्ही. पाटील यासह अनेक गावातील ग्रंथालयाचे संचालक उपस्थित होते.

Protected Content