पाचोऱ्यात युवतींच्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेस प्रारंभ

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे आर्मी ग्रुपतर्फे नुकतीच भव्य अशा युवती मॅरेथॉन स्पर्धेस सुरवात झाली. ही स्पर्धा कर्नाटक, मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यातील युवतींसाठी आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेत प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये, द्वितीय २१ हजार रुपये, तृतीय ११ हजार रुपये, चौथे बक्षीस ७ हजार रुपये तर पाचवे बक्षीस ५ हजार रुपये ठेवण्यात आले असून स्पर्धेसाठी ३०० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली होती. स्पर्धेत १५० युवतींनी सहभाग घेतल्यानंतर ४ फेऱ्यांमध्ये पाचोरा येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात १६०० मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा मालोजीराव भोसले यांनी केले. स्पर्धेची अंतिम फेरी दि. २ रोजी बुधवारी सकाळी ८ वाजता सुरू करण्यात येणार आहे.

पाचोरा तालुक्यातील सेवानिवृत्त सैनिकांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. यात प्रामुख्याने आर्मी ग्रुपचे अध्यक्ष म्हणून रोहित महाजन, रतीलाल पाटील, मनोहर पाटील, सुरेश पुजारी, गुलाब पाटील, दिपक पाटील, डी. डी. महाजन, कॅप्टन प्रल्हाद वाघ, रवींद्र पाटील, बाळू नलावडे, यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत वसई, पालघर, पुणे, मुंबई, नाशिक, धुळे, जळगाव , ठाणे, सिन्नर, बुलढाणा, खामगाव, सिल्लोड, मोहरा, अकोला, बडनेरा, भूर्जड, परभणी, यावल, गमन, जालना, मालेगाव, चाळीसगाव, शेगाव, बहाळ, कल्याण सह पाचोरा तालुक्यातील सुमारे १५० युवतींनी सहभाग घेतला.

Protected Content