महाशिवरात्री निमित्त ‘हर हर महादेव’ जयघोषात भाविकांनी घेतले महादेवाचे दर्शन

पाचोरा, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाशिवरात्री निमित्त मंगळवारी सकाळ पासूनच भाविकांनी रांगा लावून ‘हर हर महादेव’च्या जयघोषात हजारो नागरीकांनी बेलपत्ता, धोतऱ्याची फळे व फुले वाहून महादेवाचे दर्शन घेतले.

पाचोरा शरातील भडगाव रोडवरील रामदेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. शहरातील वरखेडी नाका येथील महादेव मंदिर, बांबरुड खु येथील गिरणा, गडद व तितूर या त्रिवेणी संगमावरील त्रिवेणी संगमेश्वर महादेव मंदिर, गडद तितूर व अग्नावती त्रिवेणी संगमावरील संगमेश्वर येथील पुरातन महादेव मंदिर येथे भाविक दर्शनासाठी जमले होते.

यासह बहुळा नदीवरील पिंपळगाव (हरेश्वर) येथील श्री हरीहरेशवर मंदिर दिघी येथील सुमारे ८०० वर्षांचे पुरातन महादेव मंदिर खेडगाव नंदीचे येथील उतावळी नदी तीरावरील नंदीचे मंदिर, वाणेगाव व निंभोरी येथील महादेव मंदिर, बांबरुड (राणीचे) येथील महादेव मंदिर अंतुर्ली बु येथील पुरातन महादेव मंदिर, तारखेडा येथील महादेव मंदिर अशा तालुका भरातील अनेक गावांतील महादेव मंदिरात जाऊन हजारो नागरिक, महिला, युवक युवतींनी महादेवाचे दर्शन घेतले. याप्रसंगी शहरात व तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर भाविकांनी साबुदाणा खिचडी व फराळाचे वाटप केले.

Protected Content